आमच्या विषयी

द्राक्ष, डाळिंब, शिमला, टोमॅटो ह्या मुख्य पिकाव्यतिरिक्त इतर भाजीपाला पिकातील समस्या विषयी शेती क्षेत्रातील अनुभवी तज्ञ मंडळी मार्फत मार्गदर्शन करण्यासाठी डॉ.क्रॉप गुरु ह्या शेतीविषयक अॅपची सुरुवात केलेली आहे.
प्रत्येक पिकामधील २० वर्ष पेक्षा जास्त अनुभव असलेल्या मार्गदर्शकांमार्फत शेतीमधील छोट्यातल्या छोट्या अडचणी सोडवून कमीत कमी खर्चात अधिक व दर्जेदार उत्पन्न मिळविण्यासाठी डॉ.क्रॉप गुरु ह्या शेतीविषयक मोबाईल अँप सेवा प्रणाली मार्फत मार्गदर्शन व मदत करण्याचा मानस आहे.


डॉ. क्रॉप गुरु मार्फत दिल्या जाणाऱ्या सेवा विषयी थोडक्यात माहिती खालीलप्रमाणे :-

१) डॉ. क्रॉप गुरु ह्या अँड्रॉइड मोबाईल अँपमधून द्राक्षे ,डाळिंब, शिमला मिरची,टोमॅटो या व्यतिरिक्तइतर वेलवर्गीय पिके तसेच भाजीपाला वर्गीय पिकाविषयी सखोल मार्गदर्शन केले जाईल.
२) प्रत्येक पिकातील २० ते २५ वर्षे अनुभवी मार्गदर्शक वेळोवेळी आपल्या शेताला भेट देऊन संबंधित पिकाविषयी मार्गदर्शन करतील.
३) डॉ. क्रॉप गुरु ह्या युट्युब चॅनेल मार्फत चालू स्थितीतील येणाऱ्या नवनवीन समस्या व त्यावरील उपाय योजनांसाठी मार्गदर्शनपर व्हिडिओ मधून आपणास मार्गदर्शन केले जाईल.
४) डॉ. क्रॉप गुरु मधील वेळापत्रक या सदरातून आपणास आपल्या पिकातील अवस्थांनुसार येणाऱ्या रोग, किडी तसेच दैनंदिन कामाविषयी मार्गदर्शन केले जाईल.
५) डॉ. क्रॉप गुरु मधील शासकीय योजना या सदरातून शासनाच्या आलेल्या नवनवीन योजना विषयी संपूर्ण माहिती उपलब्ध करून दिली जाईल.
६) डॉ. क्रॉप गुरु मधील हवामान अंदाज या संदरातून आपणास पुढील पाच दिवसाचा अंदाज दिला जाईल.व हवामान अंदाजानुसार आपल्या शेतात काम करण्याविषयी वेळोवेळी मार्गदर्शन केले जाईल.
७) डॉ.क्रॉपगुरु इमर्जन्सी कॉल या सदरातून आपण कॉल करून थेट तज्ञ सल्लागाराशी आपल्या शेतातील अडचणी विषयी संवाद साधून आपल्या अडचणी तात्काळ सोडवू शकतात.
८) प्रश्न विचारा या सदरातून आपण आपल्या शेतातील अडचणी विचारून तात्काळ सल्ला मिळवु शकतात.
९) तसेच आपल्या शेतातील दैनंदिन काम व तज्ञांचे वेळापत्रक डायरीमध्ये जोडून आपल्या शेतातील वार्षिक कामांचा अहवाल वर्षानुवर्षे जतन करून ठेवता येऊ शकतो.
१०) माती, पाणी, पान देठ अहवाल जोडून आपली शेती पिकातील अन्नद्रव्य आणि पाणी व्यवस्थापन यांचे नियोजन करू शकतात
११) शेती विषयक माहितीचे व आपल्याला नेहमी पडणारे प्रश्नाचे उत्तर आपल्याला सामान्य प्रश्न(FAQ)या सदरातून मिळवता येतील.


डॉ क्रॉप गुरु वैशिष्ट्ये :-

१) कमी खर्चात जास्त उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील अनुभव मार्गदर्शकांचे शेतावर जाऊन सखोल मार्गदर्शन करणारे अनुभवी मार्गदर्शकांची टीम.
२) आपल्या शंकांचे ऑनलाईन निरसन करण्यासाठी इमर्जन्सी कॉल सेवा उपलब्ध.
३) यूट्यूब चैनलमार्फत अद्यायावत माहिती व मार्गदर्शन शेतकऱ्यांना अनुभवीटीमकडून उपलब्ध.
४) शासनाच्या विविध योजनांची माहिती फक्त एका क्लिकवरून उपलब्ध.
५) हवामान आधारित सल्ला वेळोवेळी शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देणारी मार्गदर्शकांची टीम.
६) सर्व पिकांमधील दांडगा अनुभव असलेले व त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष तुमच्या शेतात वापर करून हमखास उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता असलेली सल्लागारांची टीम.
७) निर्यातक्षम पिकाबद्दल उत्पादनाचा पुरेपूर अनुभव.
८) सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देऊन दर्जेदार विषमुक्त गुणवत्तापूर्ण उत्पादन काढून देण्याची क्षमता.