ब्लाॅग

द्राक्षबागेत करपा, काडीपरिपक्वतेच्या समस्या..


गेल्या काही दिवसांतील पावसामुळे नवीन फुटीचा जोम जास्त वाढला आहे. वेलीच्या नव्या फुटींवर करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. या रोगाचे जीवाणू सुरवातीला पानांवर, नवीन फुटींवर प्रादुर्भाव करतात. कोवळ्या फुटींवर तपकिरी रंगाचे डाग दिसतात. जास्त प्रादुर्भाव झाल्यानंतर पुढे ते जीवाणू कोवळ्या काडीवर आणि कालांतराने परिपक्व काडीमध्येही प्रवेश होतो. जास्त प्रादुर्भावाच्या स्थितीमध्ये नियंत्रण शक्य झाले नसल्यास पुढील हंगामात द्राक्ष घडांवरही त्याचे परिणाम दिसून येतात. त्यामुळे या रोगाचे वेळीच नियंत्रण करणे महत्त्वाचे आहे. या वेळी पाऊस संपताच बागेतील नवीन कोवळ्या फुटी काढून टाकाव्यात. त्यानंतर बागेमध्ये बोर्डो मिश्रणाची फवारणी करावी. या वेळी काडी परिपक्व झालेली असल्यामुळे १ टक्के बोर्डों मिश्रणाच्या फवारणीचा फायदा होतो. त्यासोबत कॉपर युक्त बुरशीनाशकांची फवारणी केल्यास रोगनियंत्रण सोपे होईल.